शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 हजार, शहादा क्रमांक 2 मधील 1 हजार 263 ग्राहकांकडून 88 लाख 7 हजार, तळोदा येथील 1 हजार 166 कृषिपंपधारकांकडून 68 लाख 64 हजार तर अक्कलकुवा येथील 484 कृषिपंपधारकांकडून 27 लाख 54 हजार तसेच धडगाव येथील 44 कृषिपंपधारकांकडून दोन लाख 60 हजार असे एकूण चार तालुक्यातील 4 हजार 305 कृषिपंपधारकांकडून 3 कोटी रुपयांची वसुली अद्याप करण्यात आलेली आह़े शहादा उपविभागासह इतरही कृषिपंपधारकांकडे कोटय़ावधी रुपयांची वीज बिल थकबाकी आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी असलेल्या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती़ यामुळे संबंधित कृषिपंपधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ ऐन रब्बी हंगामात कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत असल्याने कारवाईसाठी आलेल्या महावितरणचे अधिकारी व संबंधित कृषिपंपधारक यांच्यात वादही होत असत़ कृषिपंपाची ऐवढी थकबाकी भरणे शक्य नसल्याचे संबंधित कृषिपंपधारकांकडून वेळोवेळी महावितरणच्या अधिका:यांना सांगण्यात आल़े परंतु थकबाकी भरली नाही तर, वीज जोडणी खंडीत करण्याची कडक भूमिका महावितरणकडून घेण्यात आली होती़ त्यामुळे यानुसार सुमारे 800 थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीजजोडणी खंडीतही करण्यात आली होती़ परंतु त्यानंतर राज्य शासनाकडून  30 नोव्हेंबर्पयत कुठल्याही थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीजजोडणी खंडीत करण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती़ तथापि त्यानुसार सुमारे 800 कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला होता़ परंतु शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम पूर्ण झाला आह़े त्यामुळे पुन्हा थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या मनात कारवाईची धडकी भरली असल्याचे दिसून येत आह़े सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्यभरातील थकबाकीदार कृषिपंपधारकांबाबत यात निर्णय झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे शहादा उपविभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्याकडून सांगण्यात आले आह़े पावसाअभावी शेतक:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे उत्पन्नातही घट झाली होती़ त्यामुळे याचा विचार करुन शासनाने कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संबंधित कृषिपंपधारकांकडून करण्यात आली आह़े