नवापुरच्या विलगीकरण कक्षात सुविधांमुळे दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:40 IST2020-05-07T12:40:32+5:302020-05-07T12:40:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : विलगीकरणासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणी जेवणासह इतर सुविधा समाधानकारकरित्या देण्यात येत असल्याचे ...

नवापुरच्या विलगीकरण कक्षात सुविधांमुळे दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : विलगीकरणासाठी शहरात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही ठिकाणी जेवणासह इतर सुविधा समाधानकारकरित्या देण्यात येत असल्याचे दिसून आले. दोन्ही ठिकाणी ४७ जण तर होम क्वॉरंटाईन केलेल्यांची तालुक्यातील संख्या तीन हजार ८५५ आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचे व मुलींचे वसतिगृहात पुरुषांची तर जयहिंद छात्रालयात महिलांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. ‘लोकमत’कडून या कक्षात मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला़ वरिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात १६ जण व मुलींचे वसतिगृहात सात जण विलगीकरण कक्षात होते. दोन्हींसाठी तीन वैद्यकीय अधिकारी तेथे हजर दिसून आले. सकाळचा नाश्ता, दोन वेळचा चहा व दोन्हीवेळचे जेवण अगदी वेळेवर व चांगल्या दर्जाचे देण्यात येत असल्याचे दिसून आले. विलगीकरण कक्षात दर आठवड्याला पालिकेकडून ओषध फवारणी करण्यात येत असल्याचेही समोर आले. जयहिंद छात्रालयात युवती व महिला मिळून २४ जण आहेत. तेथेही सोयी सुविधा तशाच आढळून आल्या. उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांच्या गेल्या आठवड्यातील विलगीकरण केंद्रास झालेल्या भेटीनंतर याठिकाणी मनोरंजनासाठी टी.व्ही. संचही उपलब्ध झाल्याने कक्षातील महिलांना सोयीचे झाल्याचे दिसून आले. तालुक्यात इतरत्र ठिकाणाहून आलेले एकूण तीन हजार ८५५ जण होम क्वारंटाईन आहेत. त्यांचे कार्यालयीन सोपस्कार आरोग्य विभागाने पार पाडले आहेत. संस्थात्मक व खाजगी स्तरावर विलगीकरण केलेल्या कुणासही सर्दी व इतर लक्षणे दिसून आलेले नाही ही समाधान देणारी बाब असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले.
येथील सीमा तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या एक आरोग्य सहायक धुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही प्रशासनास न कळवता कर्तव्यावर हजर झाला होता. ही बाब उघडकीस आल्याने त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल नकारात्मक आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ठरलेल्या कालावधीत त्या आरोग्य सहायकाचे स्वॅब दुसऱ्यांदा घेतले जाणार असल्याने त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातच त्याला ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत तो कर्तव्यावर हजर होता अशा १५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यात एका सहायक पोलीस निरीक्षक, १० पोलीस कर्मचारी व पाच आरोग्य कर्मचारी असे एकूण १६ अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश होता.
वैद्यकीय अधिकाºयांच्या चेहºयावर समाधान
४पुरुषांच्या विलगीकरण कक्षात कर्तव्यावर उपस्थित तीनपैकी दोन व जिल्ह्यातील इतर आठ असे एकूण १० वैद्यकीय अधिकाºयांना मालेगाव येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा निर्णय झाला होता. मालेगावच्या परिस्थितीविषयी येणारे वृत्त व जिल्ह्यातील आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी सतत कामावर हजर राहून कर्तव्य पार पाडणारे वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथे जाण्यास उत्सुक नव्हते. त्या दहाही वैद्यकीय अधिकाºयांचे मालेगाव येथे जाणे रद्द झाल्याचा निर्णय जिल्हास्तरावरुन झाल्याने त्याचा आनंद नवापूर येथील केंद्रावर उपस्थित एका अधिकाºयाच्या चेहºयावर स्पष्टपणे झळकत होता.