दिलासा : कोरोना रुग्णांचा ग्राफ खालावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:01+5:302021-04-20T04:32:01+5:30
नंदुरबार : संचारबंदीची अंमलबजावणी, लोकांमध्ये आलेली जागरूकता आणि प्रशासनाच्या उपाययोजना यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. ...

दिलासा : कोरोना रुग्णांचा ग्राफ खालावतोय
नंदुरबार : संचारबंदीची अंमलबजावणी, लोकांमध्ये आलेली जागरूकता आणि प्रशासनाच्या उपाययोजना यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. स्वत: जिल्हाधिकारी यांनी याबाबत समाजमाध्यमांवर माहिती शेअर केली आहे.
जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली. त्यामुळे १ एप्रिलपासून जिल्हास्तरावर प्रशासनाला लॉकडाऊन सुरू करावे लागले. १५ एप्रिलपासून राज्यस्तरीय संचारबंदीदेखील लागू झाली आहे. त्यातच कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी गती दिली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ४ एप्रिल रोजी २५९ रुग्ण होते. ५ एप्रिल रोजी ७०५ रुग्ण आढळले. ७ एप्रिल रोजी १२१३ रुग्ण, ९ एप्रिल ६८४, १० एप्रिल ६८२, ११ एप्रिल ४३६, १८ एप्रिल २८६ तर १९ एप्रिल रोजी १८८ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्हावासीयांना हायसे वाटले आहे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्येदेखील बेड सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. असाच ट्रेण्ड कायम राहिला तर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून त्रिसूत्रीची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.