पपईच्या झाडांवर रंगीबेरंगी कापडाचे आवरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:46 IST2020-10-28T12:46:45+5:302020-10-28T12:46:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पपई पिकाचे तापमानापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावरील फळांना रंगीबेरंगी कापडाचे आवरण दिले आहे. जिल्ह्यात ...

Colorful cloth cover on papaya trees | पपईच्या झाडांवर रंगीबेरंगी कापडाचे आवरण

पपईच्या झाडांवर रंगीबेरंगी कापडाचे आवरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पपई पिकाचे तापमानापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावरील फळांना रंगीबेरंगी कापडाचे आवरण दिले आहे.
जिल्ह्यात पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. सध्या पपईच्या पिकांना फळ धारणा झाली असून, हे फळ परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे पपईच्या फळांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम जाणवतो. त्यामुळे विक्रेते असे फळ घेत नाही. म्हणून फळ सुस्थितीत असावे व चांगले उत्पादन मिळावे यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयत्न होत आहेत. बहुतांश शेतकरी फळांना कापड व कागदाचे आवरण लावतात. नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर शिवारातील एका शेतकऱ्याने पपईच्या प्रत्येक झाडावर रंगीबेरंगी कापडाचे आवरण लावले आहे. त्यामुळे ही पपईची बाग लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, पपईवर सध्या रोगांचा प्रादुर्भाव ही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशकासह घरगुती उपायही केले जात आहेत.

Web Title: Colorful cloth cover on papaya trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.