महामार्गावर दुचाकी घसरून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:49 IST2019-07-17T12:49:15+5:302019-07-17T12:49:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील कन्हाळा रस्त्यावर मोटर सायकल अपघातात एक युवक जागीच ठार झाल्याची ...

महामार्गावर दुचाकी घसरून युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळील कन्हाळा रस्त्यावर मोटर सायकल अपघातात एक युवक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांनुसार, सोन्या (गणेश) रडक्या गावित (19) रा.विसरवाडी हा सोमवार 15 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्याच्या ताब्यातील विना पासिंगची नवीन मोटरसायकलने विसरवाडी येथे घरी येत होता.
विसरवाडी कन्हाळा रस्त्यावर नसिर्ंग कॉलेज जवळ त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने अचानक मोटरसायकल स्लीप झाली. त्यात तो फरफटत गेला. या अपघातात तो रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत दिलीप अजरुन गावित याने विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यावरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
तपास सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार राजेश येलवे करीत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.