फार्मसी कॉलेजच्या शिक्षकांचे कोरोनावर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:46 IST2020-05-19T12:46:23+5:302020-05-19T12:46:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांनी कोविड-१९ या विषाणूवर ...

College of Pharmacy Teachers Research on Corona | फार्मसी कॉलेजच्या शिक्षकांचे कोरोनावर संशोधन

फार्मसी कॉलेजच्या शिक्षकांचे कोरोनावर संशोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील जिजामाता शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांनी कोविड-१९ या विषाणूवर केलेला संशोधनात्मक लेख एशियन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे़ वनस्पतींच्या आधाराने कोरोनावर मात करणे शक्य असल्याचे या लेखात मांडले आहे़
महाविद्यालयाचे प्रा़ राकेश एऩ चौधरी व सहलेखक प्राचार्य रविंद्र एस़ चौधरी या दोघांनी कोरोना व्हायरसवर संशोधन करुन त्यावर लेख लिहिला होता़ ‘सायटोस्टेरोल आयसोलेशन फ्रॉम म्यूनेटींजिया कालाबुरा लिन बार्क एक्सट्रॅक्ट स्ट्रक्टचरल एल्युसिडेशन मॉलेक्यूर डॉकिंग स्टडीज अ‍ॅस पोटेंशियल इनहीबीचॉर सार्स कोव्हीड एमप्रो’ या शिर्षकाचा हा लेख आहे़ यातून दोघांनी वनस्पतींचा आधार घेत रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती कशा प्रकारे वाढवता येऊ शकते याची मांडणी केली आहे़
प्रा़ राकेश चौधरी यांना प्राचार्य डॉ़ आऱएस़चौधरी व शाहरुख खान या दोघांचे सहकार्य लाभले़ एशियन जर्नल आॅफ फार्मास्युटिकल्स अँड क्लिनिकल रिसर्चचे डॉ़ अनुरेख जैन यांनी याबाबत दोघांना पत्र पाठवले आहे़
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे़ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत जनजागृतीचे काम होत आहे़ त्यातच प्रा़ चौधरी यांच्या लेखातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जमैकन पेरी, पनामा बेरी, सिंगापूर चेरी या वनस्पतींचा आधार लेखातून घेतला गेला आहे़ कोरोनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला असल्याची माहिती प्रा़ राकेश चौधरी यांनी दिली आहे़
कोरोना फेवीपिरावोर ह्या बायोलॉजिकल औषधाची क्षमता जास्त असल्याने रुग्ण लवकर बारा होण्यास मदत होईल असे त्यांनी सिद्ध केले आहे़ प्रा़ चौधरी यांच्यासह प्राचार्य आऱएस़चौधरी व प्रा़ शाहरुख खान यांचे संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ़ विक्रांत मोरे, सचिव डॉ़ अभिजीत मोरे यांनी कौतूक केले आहे़

Web Title: College of Pharmacy Teachers Research on Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.