नंदुरबारसह खान्देशात आठवडाभरात थंडीचा जोर वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:46 IST2018-11-16T12:46:31+5:302018-11-16T12:46:36+5:30
‘गज’ वादळाचा परिणाम : नंदुरबारातील किमान तापमान 14 अंशावर जाणार

नंदुरबारसह खान्देशात आठवडाभरात थंडीचा जोर वाढणार
नंदुरबार : उत्तरेकडून शित लहरींचा प्रभाव वाढल्याने नंदुरबारातील किमान तापमानात घट झाली आह़े येत्या आठवडय़ात नंदुरबारातील किमान तापमान 14 अंश सेल्सिअसवर जाणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गाजा’ या चक्री वादळामुळे आठवडय़ाभरात तापमानात अधिक घट होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आह़े
सध्या दक्षिण-पूर्व वा:यांचा प्रभाव अधिक आह़े त्यातच बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ निर्माण झालेले दिसून येत आह़े यातून कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन परिणामी उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव वाढणार असल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात आले आह़े नंदुरबारसह जळगाव व धुळे येथील किमान तापमान 14 अंशार्पयत जाण्याची शक्यता आह़े बंगालच्या उपसागरात ‘गाजा’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आह़े तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनमेच्या दक्षिण-पूर्व भागात चक्रीवादळ स्थिरावले असून यातील वा:यांचा वेग ताशी 80 ते 90 किमी असल्याचे ‘आयएमडी’तर्फे सांगण्यात आले आह़े ‘गाजा’ चक्रीवादळामुळे समुद्र किनारी भागात पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आह़े या सर्व वातावरणीय बदलामुळे शित लहरींचा प्रभाव वाढून थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, सध्या नंदुरबार जिल्ह्यात रात्रीच्या किमान तापमानात घट झाली असून आठवडाभरात थंडीचा अधिक प्रभाव जाणवनार आह़े गेल्या काही दिवसांपासून वेगवान वातावरणीय बदल होताना दिसून येत आह़े नंदुरबारात दुपारच्या वेळी काही प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवत आहेत तर, सकाळी व मध्यरात्री गारवा निर्माण होत आह़े