Vidhan Sabha 2019: 24 तास सुरु राहणार आचारसंहिता कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:59 IST2019-09-26T11:58:58+5:302019-09-26T11:59:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचेकडे या ...

Vidhan Sabha 2019: 24 तास सुरु राहणार आचारसंहिता कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचेकडे या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या तक्रारींबाबत कक्षाचे विशेष लक्ष राहणार आहे. कक्षात पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी 24 तास हजर राहून येणा:या तक्रारींची नोंद घेणार आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती तात्काळ संबंधित विभागास कारवाई करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.
सिव्हीजील अॅपवर प्राप्त तक्रारींवर कार्यवाहीबाबतचा आढावादेखील या कक्षाकडून घेण्यात येणार आहे. केंद्रीत पद्धतीने तक्रारींची दखल घेण्यात येणार असल्याने त्याबाबत वेगाने कार्यवाही करणे शक्य होणार आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी चारही विधानसभा मतदारसंघात दूरचित्रीकरण पथकाचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.
कक्षात (02564- 210777) हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना (1950) या टोल फ्री क्रमांकावरदेखील तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भरारी पथकांची मदत घेण्यात येणार आहे. नागरिकांनी निवडणुका पारदर्शक पद्धतीने व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहाय्य करावे व आचारसंहिता भंगाबाबत आचारसंहिता कक्षाकडे माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.