आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:04 IST2019-11-21T12:04:20+5:302019-11-21T12:04:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर ...

The code of conduct should be strictly implemented | आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असल्याने निवडणूका असलेल्या क्षेत्रात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, ग्रामीण भागात उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक प्रक्रीयेत विशेष दक्षता घेण्यात यावी. आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत ग्रामसेवकांना सुचना देण्यात याव्यात. राजकीय पोस्टर्स आणि बॅनर्स काढण्यात यावे. विशेषत: शासकीय इमारत परिसरात लोकप्रतिनिधींची नावे असणारे फलक झाकण्यात यावे.
निवडणूक निकाल जाहीर होईपयर्ंत आचारसंहिता अंमलात राहील. जिल्हा परिषदेतील मतदारावर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा स्थानिक स्वराज्य संस्था व लोकप्रतिनिधींना करता येणार नाही. या कालावधीत शासकीय यंत्रणा किंवा पदाचा दुरुपयोग करता येणार नाही. आचारसंहिता लागू असणा:या क्षेत्रात नियोजन समिती किंवा अन्य समितीची बैठक घेता येणार नाही. 
आचारसंहिता कालावधीत नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी कामे करण्यास बंदी असणार नाही.
निवडणूक जाहीर होत असताना प्रत्यक्ष सुरू असलेली कामे सुरू ठेवता येतील. स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून झालेल्या कामाचे भूमीपुजन किंवा उद्घाटन करता येणार नाही. शासकीय वाहनांचा प्रचारासाठी उपयोग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात याव्यात व निवडणूकीसाठी आवश्यक पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार करण्यात यावी, असे त्यांनी    सांगितले.
यावेळी श्री.निकम यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून आचारंहितेतील ठळक बाबींची माहिती दिली. मतदान 7 जानेवारी तर मतमोजणी 8 जानेवारी रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
एकूण 56 निवडणूक विभाग व 112 निर्वाचक गण असून 10 लाख 7 हजार 347 मतदार 1,232 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: The code of conduct should be strictly implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.