मुख्यमंत्री पुढील आठवड्यात नंदुरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:22 IST2020-02-05T21:22:35+5:302020-02-05T21:22:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढील आठवड्यात नंदुरबार दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या हस्ते नंदुरबार पालिकेच्या ...

CM next week in Nandurbar | मुख्यमंत्री पुढील आठवड्यात नंदुरबारात

मुख्यमंत्री पुढील आठवड्यात नंदुरबारात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढील आठवड्यात नंदुरबार दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या हस्ते नंदुरबार पालिकेच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व उद्घाटन करण्यात येणार आहे. साधारणत: १५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा जिल्ह्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत धडगाव येथे त्यांची प्रचार सभा झाली होती. तेंव्हाच त्यांनी निवडणुकीनंतर नंदुरबारात येण्याचे जाहीर केले होते.
साधारणत: १५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय इतरही विकास कामांचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. जाहीर सभेला देखील ते संबोधीत करणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून लवकरच अधिकृत दौरा जाहीर केला जाणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे जनतेसह प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

Web Title: CM next week in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.