मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST2021-08-28T04:34:17+5:302021-08-28T04:34:17+5:30
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात २०१७ पासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली असून ही ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची चौकशी व्हावी
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात २०१७ पासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली असून ही कामे तांत्रिक अंदाजपत्रकानुसार झालेली नाहीत. जी कामे झाली आहेत त्यात रस्त्यांच्या भूपूष्ठावर झालेले खडीकरण, मुरुम, डांबर, कारपेट अशी अगदी किरकोळ स्वरुपात करुन मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फलकावर ज्या पद्धतीने अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे त्या पद्धतीने कामे झालेली नाहीत. संबंधित विभागातील कार्यकारी अभियंता व स्थानिक अभियंत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी विविध रस्त्यांच्या कामात कशा पद्धतीने फसवणुकीची कामे झाली याबाबतचा तक्ता जोडला आहे. संबंधित कामांची चौकशी करुन ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्रामसडक योजनेच्या कामांमध्ये कशा पद्धतीने अंदाजपत्रकानुसार कामे झाली नाही यासंदर्भातील रस्तानिहाय माहिती आपण तक्रारीत दिली असून शासनाच्या पोर्टलवर देखील तक्रार नोंदवली आहे. परंतु ५० दिवसानंतरही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही.
-बाबूलाल नाईक, शहादा