चालत्या ट्रकमधून कापडाचे गठ्ठे लंपास
By Admin | Updated: January 23, 2017 00:46 IST2017-01-23T00:46:25+5:302017-01-23T00:46:25+5:30
सारंगखेडा : चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री कापून 50 हजार रुपयांचे कापडाचे गठ्ठे चोरल्याची घटना 21 रोजी रात्री शहादा ते तोरखेडा दरम्यान घडली

चालत्या ट्रकमधून कापडाचे गठ्ठे लंपास
सारंगखेडा : चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री कापून 50 हजार रुपयांचे कापडाचे गठ्ठे चोरल्याची घटना 21 रोजी रात्री शहादा ते तोरखेडा दरम्यान घडली. याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथून मध्य प्रदेशात कापडाच्या गाठी घेऊन ट्रक (क्रमांक एमएच 18 एम 5706) शहादा-शिरपूर रस्त्याने जात होता. शहादा ते तोरखेडा दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी चालत्या ट्रकवर चढून मागील बाजूची ताडपत्री कापली. आतील कापडाचे गठ्ठे व साडय़ांचा गठ्ठा चालत्या ट्रकमधून चोरून नेला. चालक जावेदखान शेरू खान यांनी ट्रकच्या मागील बाजूची ताडपत्री फाडल्याचे आणि कापडाचे गठ्ठे कमी असल्याचे पाहिल्यावर सारंगखेडा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहादा-शिरपूर रस्त्यावर चोरीचे प्रमाण वाढले आहे. चालत्या वाहनातून वस्तूंची चोरी वाढली असून, रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)