शहाद्यात सराफा व्यावसायिकांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:15 IST2019-07-19T11:15:53+5:302019-07-19T11:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील सोनार गल्लीतील सराफा व्यावसायिकाला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी सोनार व्यापारी असोसिएशनतर्फे बंद ठेवून तहसीलदार ...

शहाद्यात सराफा व्यावसायिकांचा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील सोनार गल्लीतील सराफा व्यावसायिकाला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी सोनार व्यापारी असोसिएशनतर्फे बंद ठेवून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आरोपींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
शहरातील सोनार गल्लीतील स्टार गोल्ड या दुकानाचे मालक यतीन शरदचंद्र सोनार यांनी 2016 मध्ये संशयित सलीम शेख यांच्याशी शेतीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. या विक्रीपोटी असलेली रक्कम देऊनही बुधवारी सकाळी आरोपी व त्यांचे नातेवाईकांनी दुकानावर येऊन सोनार यांच्याकडे पैशाची मागणी केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळाने सलीम शेख याने आपल्या कुटुंबांसह इतरांना जमा करून सोनार व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून दुकानाची नासधूस केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील सराफ असोसिएनने बंद पाळून आरोपींना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. या वेळी विलास सोनार, अमित सोनार, हेमंत सोनार, प्रवीण सोनार, संजय सोनार, किशोर वर्मा, हेमराज जैन, कुणाल सोनार, राकेश सोनार, अश्विन सोनार, प्रकाश सोनार, राम जाधव, कचरूलाल नहाटा यांच्यासह शहर व तालुक्यातील सराफ व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सराफा व्यावसायिक उपस्थित होते.
दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे व पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी सराफ बाजारात जाऊन व्यवसायिकांची चर्चा केली व आरोपींना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे व्यापा:यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सराफ व्यापारी असोसिएशनचे विनोद शंकर सोनार यांनी केली आहे.