नवापुरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:40+5:302021-02-07T04:29:40+5:30
नवापूर येथे एकूण २६ पाेल्ट्री फार्म आहेत. त्यात सुमारे नऊ लाख पक्षी असून, ते टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याची माेहीम सुरू ...

नवापुरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट
नवापूर येथे एकूण २६ पाेल्ट्री फार्म आहेत. त्यात सुमारे नऊ लाख पक्षी असून, ते टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याची माेहीम सुरू करण्यात येणार आहे. तसेच नवापूरच्या १० किलोमीटर त्रिजेच्या क्षेत्रात अंडी, पक्षी, पशुखाद्य, विष्टा वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. तसेच पोल्ट्री फार्मचे परिसर सील करण्यात आले आहे. दरम्यान बर्ड फ्लू नियंत्रणासाठी नवापुरात नाशिक, नगर, धुळे, जळगाव आदी ठिकाणांहून सुमारे १०० पथकांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच हा परिसर गुजरातच्या सीमेवरील परिसर असल्याने सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी ६० पोलीस कर्मचारी व २० महिला कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.
२००६ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवापुरात सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. हा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार