शहाद्यात पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:54+5:302021-06-19T04:20:54+5:30

शहादा शहर व परिसरात पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी तुंबून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. डोंगरगाव रोडकडून येणाऱ्या ...

Cleaning of drains and gutters in Shahada before monsoon | शहाद्यात पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची स्वच्छता

शहाद्यात पावसाळ्यापूर्वी नाले व गटारींची स्वच्छता

शहादा शहर व परिसरात पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी तुंबून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. डोंगरगाव रोडकडून येणाऱ्या नाल्याचे पाणी सरळ डोंगरगाव रोडमार्गे शहरात शिरते व अनेक वसाहतींमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होते.

मागीलवर्षी जोरदार पाऊस झाल्याने डोंगरगाव रोड चौफुली परिसर, हॉटेल रेसिडेन्सी, शहादा न्यायालय, पुरुषोत्तम मार्केट, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांचे नुकसान झाले होते. यावर्षी असे पाणी साचू नये म्हणून डोंगरगाव रोडकडून येणाऱ्या मुख्य पाट व शहरातील सर्वच मुख्य गटारींची स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते आता पूर्णत्वास आले आहे.

स्वच्छतेवेळी मुख्याधिकारी राहुल वाघ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण, परेश पवार, गणेश डांबरे, गणेश बाशिंगे, गोपाळ कोळी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Cleaning of drains and gutters in Shahada before monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.