कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग शाळेत भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:55+5:302021-07-07T04:37:55+5:30

मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ...

Classes VIII to XII will be held in the school in the corona free zone | कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग शाळेत भरणार

कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग शाळेत भरणार

मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व शिक्षकांच्या उपस्थितीबाबतही मार्गदर्शन परिपत्रकात केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत आहे. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा बंद व मुले घरी राहण्याचे दुष्परिणाम लक्षात घेता सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाईल इंटरनेटचा गैरवापर, गेम खेळणे यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मानसिक तणाव, डोमेस्टिक व्हायलोन्सचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट, शेतीकामात लावणे आदींमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ

शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे, शिक्षकांची कोरोनाबाबत चाचणी करणे, वर्गखोली तसेच स्टॉप रूममधील बैठक व्यवस्था, शारीरिक अंतराच्या नियमानुसार करणे, शाळेतील कार्यक्रम परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा यावर निर्बंध असावेत, आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्यांना कोरोनासंदर्भातील आव्हाने व त्यामागची भूमिका याबाबत जागृत करणे, शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे, शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन याची व्यवस्था करणे, वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करणे, तसेच कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास करावयाची कार्यवाही याबाबत सर्वांना माहिती असावी, हे शासनाने नमूद केले आहे.

ग्रामपंचायतींनी ठराव करावा, यासाठी कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी शासनाने अटी जाहीर केल्या आहेत. त्यात ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावात ग्रामपंचायतीने आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्चा करून ठराव करावा, शाळेत मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवावे, संबंधित सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, एका बाकावर एक विद्यार्थी बसविणे, दोन बाकात सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी बसविणे, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करणे आदींचा समावेश आहे.

Web Title: Classes VIII to XII will be held in the school in the corona free zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.