नवापुरात किरकोळ वादातून दोघांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:08 IST2019-07-01T12:08:48+5:302019-07-01T12:08:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरातील मच्छी बाजार भागात दोघांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली़ याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी ...

A clash between the two through a minor dispute in Navapur | नवापुरात किरकोळ वादातून दोघांमध्ये हाणामारी

नवापुरात किरकोळ वादातून दोघांमध्ये हाणामारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर शहरातील मच्छी बाजार भागात दोघांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली़ याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद देत गुन्हा दाखल केला़ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली़ 
संदीप भिका मराठे रा़ शास्त्रीनगर व रविंद्र भिका चव्हाण रा़ आंबेडकर चौक या दोघांमध्ये वाद झाला होता़ यानंतर दोघांसह त्यांचे समर्थक येथे आल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली़ याबाबत मराठे याच्या फिर्यादीवरुन रविंद्र चव्हाण, योगेश भिका चव्हाण यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र नगराळे करत आहेत़ 
रविंद्र भिका चव्हाण याच्या फिर्यादीवरुन संदीप भगवान मराठे याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार करत आहेत़ 
 

Web Title: A clash between the two through a minor dispute in Navapur