Claim again that Tiger is alive in the district! | जिल्ह्यात ‘टायगर जिंदा’ असल्याचा पुन्हा दावा़!
जिल्ह्यात ‘टायगर जिंदा’ असल्याचा पुन्हा दावा़!

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील ठाणेपाडा गावाजवळ साक्री-नंदुरबार रस्त्यावर पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती बुधवारी सोशल मिडियातून व्हायरल करण्यात आली होती़ या माहितीनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती़ दरम्यान दोन महिन्यांपासून नंदुरबार व नवापुर तालुक्यात पट्टेदार वाघाचा संचार असल्याची माहिती वारंवार दिली जात असल्याने जिल्ह्यात ‘टायगर जिंदा’ असल्याच्या दाव्याला बळकटी मिळत आहे़
बुधवारी रात्री साक्रीकडून नंदुरबारकडे येणाऱ्या चौघांना सिंदबन घाटात चालत्या वाहनातून वाघ दिसल्याची माहिती आहे़ त्यांनी ही माहिती सोशल मिडियातून दिल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे़ दरम्यान वनविभागाने हा दावा खोडून काढत पट्टेदार वाघाचे कोणत्याही प्रकारचे निशाण जिल्ह्यात नसल्याचे म्हटले आहे़ परंतू वनविभागाच्या या नकारानंतरही हा वाघ दिसल्याचा दावा फोल ठरत नसल्याचे स्पष्ट होत असून गेल्या दोन महिन्यात नवापुर तालुक्यातील नवागाव, खांडबारा, सुकवेल, नंदुरबार तालुक्यातील काही गावांमधून वाघ दिसत असल्याचे दावे करण्यात आले आहेत़ यामुळे या भागात पट्टेदार वाघ आहे किंवा कसे हे पडताळून पाहण्यासाठी वनविभाग ट्रॅप कॅमेरे लावणार आहे़ ठाणेपाड्यासह विविध भागात लावल्या जाणाºया या कॅमेºयात वाघाची छबी येत्या काळात दिसल्यास जिल्ह्यात वाघाची ‘रिएंट्री’ झाल्याचे स्पष्ट होणार आहे़
जिल्ह्यात वर्षभरापासून सुरु असलेल्या दाव्यांनंतरही वनविभाग वाघाचा संचार असल्याचे मान्य करत नसल्याचे वनक्षेत्रात राहणाºया नागरिकांचे म्हणणे आहे़ परंतू वनविभागाच्या म्हणण्यानुसार वाघाचे जिल्ह्यातील अस्तित्त्व हे सुखावणारे राहणार असून त्यातून जिल्ह्यातील वनविकासाला अधिक बळकटी येणार आहे़
आगामी आठ ते दहा दिवस दोन्ही तालुक्यात लागणाºया ट्रॅप कॅमेऱ्यांची सत्यता समोर आल्यानंतर वाघ आहे किंवा नाही हे स्पष्ट होणार असले तरी ठाणेपाड्यात दिसलेला प्राणी हा बिबट्या असल्याचे वनविभागाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे़

ठाणेपाडा येथे रस्त्यावर दिसून आलेला प्राणी बिबट्या असल्याचे वनविभाग सांगत असून वनक्षेत्रातील एका ठिकाणी बिबट्या बसल्याचा फोटोही त्यांच्याकडून देण्यात आला आहे़ वनक्षेत्रात फिरणारा हा बिबट्या पूर्ण वयस्कर असून लांबवरुन पाहिल्यास वाघासारखाच भासत असल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे वनविभाग ठामपणे नकार देत असताना नवापुर तालुक्यातील खांडबारा आणि नवागाव परिसरात वाघ असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला होता़ यानंतर याठिकाणी बºयाच दिवसांपासून शोध मोहिम सुरु आहे़ परंतू अद्याप वाघाचे कोणतेही जाणवले नसल्याचे वनविभाग सांगत आहे़

नंदुरबार पालिकेचे नगरसेवक अ‍ॅड़ चारुदत्त कळवणकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पुखराज जैैन यांनी वाघ पाहिल्याची माहिती सोशल मिडियातून दिली होती़
या माहितीनंतर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱ रणदिवे यांनी सांगितले की, या भागात दिसून आलेला प्राणी हा बिबट्या आहे़ तरीही सतर्कता म्हणून या भागात आठ ते १० ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत़ वनविभागाने ठाणेपाडा वनसंरक्षण समितीची बैठक घेत त्यांना वाघाच्या संचाराबाबत सूचना केल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: Claim again that Tiger is alive in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.