सिव्हीलच्या सीटी स्कॅन दुरूस्तीला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:31 PM2020-10-20T12:31:45+5:302020-10-20T12:33:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सिव्हीलचे सीटी स्कॅन दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. मशीन खराब होण्यास तीन आठवडे झाले ...

Civil CT scan repair not found moment | सिव्हीलच्या सीटी स्कॅन दुरूस्तीला मुहूर्त सापडेना

सिव्हीलच्या सीटी स्कॅन दुरूस्तीला मुहूर्त सापडेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सिव्हीलचे सीटी स्कॅन दुरुस्ती होत नसल्याचे चित्र आहे. मशीन खराब होण्यास तीन आठवडे झाले तरी खराब झालेला पार्ट अद्याप येऊ शकला नसल्याची स्थिती आहे. यामुळे रुग्णांना खाजगी ठिकाणी जाऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सीटी स्कॅन ऐवजी एक्सरेवर काम भागवावे लागत आहे.  
नंदुरबारचे सीटी स्कॅन मशीन गेल्या तीन आठवड्यापासून खराब झाले आहे. खराब झालेला पार्ट हा विदेशातूनच मागवावा लागणार असल्याचे मशीन पुरविणाऱ्या डिलरचे म्हणने आहे. त्यानुसार तसा पाठपुरावा सिव्हीलतर्फे करण्यात आला. परंतु अद्यापही तो पार्ट येऊ शकला नसल्याची स्थिती आहे. 
तीन वर्षांपासून मशीन 
गेल्या तीन वर्षांपासून येथील सीटी स्कॅन सुरू आहे. परंतु तंत्रज्ञच मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथे मशीन येऊन देखील साधारणत: एक ते दीड वर्ष तंत्रज्ञ नसल्यामुळे धुळखात पडून होते. जेमतेम धुळे येथून आठवड्यातून दोन ते तीन दिवस तंत्रज्ञ येऊ लागला. त्यानंतर स्थानिक एक्स रे टक्नीशिअन यांना मशीन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महागडे सीटी स्कॅन मशीन चालविण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञांची भरती करणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी अप्रतिक्षीत कर्मचाऱ्यांकडून ते चालविले जात असल्यामुळे त्यात बिघाड होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणने आहे. याबाबत गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. 

रुग्णांना खाजगी ठिकाणी घ्यावी लागतेय धाव...
सीटी स्कॅन मशीन हे वॅारंटीच्या मुदतीत आहे. त्यामुळे एखादा पार्ट खराब झाल्यास त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी व तो पार्ट मागविण्याची जबाबदारी संबधीत डीलरची आहे. आता देखील खराब झालेला पार्ट बदलून देण्यासाठी संबधीत डीलरने कंपनीकडे संपर्क साधला आहे. मशीन खराब असल्याने सामान्य रुग्णांना मात्र खाजगी ठिकाणी जाऊन सीटीस्कॅन करावे लागत आहे. कोरोना रुग्णांसाठी सीटी स्कॅन करणे आवश्यक असते. परंतु बंद असल्यामुळे अनेक रुग्ण खाजगी ठिकाणी धाव घेत आहेत. 

Web Title: Civil CT scan repair not found moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.