शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट श्वानांमुळे नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर् हवेली, वाघोदा आणि पाताेंडा शिवारात मोकाट श्वानांचा प्रश्न कायम आहे. या भागात मोकाट श्वानांचा ...

नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर् हवेली, वाघोदा आणि पाताेंडा शिवारात मोकाट श्वानांचा प्रश्न कायम आहे. या भागात मोकाट श्वानांचा त्रास वाढला असल्याने नागरीक त्रस्त आहेत. याबाबत त्यांच्याकडून तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

बांधकाम विभागाची उदासिनता

नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोळदे गावापर्यंत निर्माण झालेले खड्डे बुजवण्याची गरज असताना बांधकाम विभागाने डागडुजी म्हणून रस्त्यात खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न कलेा आहे. यातून नागरीकांचा त्रास वाढला आहे. दुसरीकडे रस्त्यात अर्ध्यावरच खड्डे बुजवण्यात आले असल्याने त्रास वाढला आहे. बांधकाम विभागाच्या या उदासिनेतेचा फटका नागरीकांना बसत आहे.

मार्गदर्शक फलक द्या

नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट गावाजवळ रस्ता काम सुरु करण्यात आले आहे. या विस्तारीकरणाच्या ठिकाणी वाहनधारकांच्या सोयीसाठी योग्य ते मार्गदर्शक फलक नसल्याने वाहने काम सुरु असलेल्या ठिकाणी जावून आदळत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.

स्ट्राॅबेरी आवक सुरु

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाब व मोलगी परिसरात पिकवली जाणारी स्ट्राॅबेरी बाजारात येवू लागली आहे. यातून उलाढाल वाढीस लागली आहे. दुर्गम भागात पिकवल्या जाणा-या स्टाॅबेरीला मोठी मागणी आहे. ही स्ट्राॅबेरी नंदुरबार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही रवाना करण्यात येत आहे.

सातपुड्यातील बंधारे ठरताहेत निरुपयोगी

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात जलयुक्त शिवारांतर्गत तयार करण्यात आलेल्या साठवण बंधा-यांची स्थिती बिकट झाली आहे. हे बंधारे दुरुस्त करण्याची सातत्याने मागणी करुनही कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कृषी विभागाच्या अखत्यारित तालुक्यातील दुर्गम व अती दुर्गम भागात बंधारे तयार करुन पाणी साठवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

बर्ड फ्ल्यूमुळे चिंता

नंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. यामुळे नागरीकांमध्ये भिती आहे. प्रशासनाकडून याबाबत जनजागृती करुन चिकन, अंडी हे खाण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा कसे याची माहिती देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कापड बाजार तेजीत

नंदुरबार : दिवाळीनंतर लग्नसराईमुळे कापड बाजारात तेजी कायम आहे. यातून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या उलाढालीतून गेल्या वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न व्यापारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बँकेबाहेरच्या गर्दीमुळे होतेय वाहतूक कोंडी

नंदुरबार : नंदुरबार शहरातील गजबजलेल्या दिनदयाल अर्थात अंधारे चाैकातील बँकेसमोर होणारी ग्राहकांची गर्दी वाहतूकीस अडचणीची ठरत आहे. ऐन चाैकाला लागून असलेल्या इमारतीच्या बाहेर दुचाकी लावल्यानंतर ग्राहकांनाही बाहेर थांबावे लागते यातून ग्राहकांच्या रांगा थेट रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. यात संबधित बँकेत आणखी एका बँकेचे विलीनीकरण झाल्याने खातेदारांची संख्या वाढली आहे. यातून दर दिवशी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसातून चार ते पाच वेळा येथे वाहतूकीची कोंडी होते. याकडे संबधित विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.