डोंगरगाव रस्त्यावर धुळीमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:37 IST2019-11-26T12:37:37+5:302019-11-26T12:37:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातून जाणारा व कायम वर्दळ असलेल्या डोंगरगाव रस्ता दुरुस्तीसाठी मुरुम टाकण्यात आला आहे. या ...

डोंगरगाव रस्त्यावर धुळीमुळे नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातून जाणारा व कायम वर्दळ असलेल्या डोंगरगाव रस्ता दुरुस्तीसाठी मुरुम टाकण्यात आला आहे. या मुरुममुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघातही वाढले आहेत.
याबाबत माहिती अशी की, शहादा-डोंगरगाव रस्त्यावर नवीन वसाहती वाढल्या आहेत. याच रस्त्यावर म्हाळसादेवीचे मंदिर, साईबाबा मंदिर, सुघोषाघंट मंदिर यासह दवाखान्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत रहदारीची वर्दळ असते. डोंगरगाव, असलोद, मंदाणे, कजर्ाेत, पिंपर्डे, लोणखेडा, मलोणी या भागातून येणा:या नागरिकांची ये-जा या रस्त्यानेच होते. त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणा:या या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरुमचा वापर करण्यात आला. या मुरुमवर पाणीही टाकण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात धूळ उडत असल्याने रस्त्याला लागून असलेले रहिवासी, व्यावसायिकांसह वाहनधारकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. सकाळी व संध्याकाळी शतपावली करणा:या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेक नागरिकांना धुळीमुळे दमा, खोकला व अॅलर्जीचा त्रास होत आहे. बांधकाम विभागाच्या अधिका:यांना याबाबत लेखी व प्रत्यक्ष सांगूनही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या मध्यभागी नगरपालिकेमार्फत स्ट्रीट लाईट लावण्यात आल्याने रस्ता रुंद झाला. मोठे वाहन आले तर पादचारी व दुचाकी वाहन चालकांना चालणेही मुश्किल होते. त्यातच रस्त्यावर डांबरी रस्ता शिल्लकच राहिलेला नाही. वाहन चालले तर एवढी धूळ उडते की रस्त्यावर चालणारा माणूस धुळीने भरुन जातो. शिवाय रस्ता अरुंद झाल्याने व खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.