प्रशासनाच्या उपाययोजनांना शहरवासीयांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:26 IST2020-04-20T12:26:33+5:302020-04-20T12:26:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एवढ्या उपाययोजना करून, सतर्कता बाळगूनही जे व्हायला नको होते तेच होऊन नंदुरबारात कोरोना रुग्ण ...

प्रशासनाच्या उपाययोजनांना शहरवासीयांनी सहकार्य करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एवढ्या उपाययोजना करून, सतर्कता बाळगूनही जे व्हायला नको होते तेच होऊन नंदुरबारात कोरोना रुग्ण आढळला. असे असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या आवाहनांना आणि उपाययोजनांना प्रतिसाद देवून या संकटाला दूर करावे असे आवाहन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
शहरातील संपुर्ण लॉकडाऊन आणि उपाययोजनांबाबत बोलतांना चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, सुरुवातीपासून शासन, प्रशासन, स्थानिक नगरपालिका यांनी प्रभावी उपाययोजना करून कोरोनाला दूर ठेवले होते. नंदुरबार ग्रीन झोनमध्ये आले, हळूहळू गाडी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असतांनाच शहरात दुर्देवाने कोरोनाचा रूग्ण आढळला. यामुळे सर्वांच्या चिंतेत वाढ झाली. या संकटाला सर्वांना धिराने सामोरे जायाचे आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे. सुचनांचे पालन करावे, ठिकठिकाणी पालिकेतर्फे जंतूनाशक फवारणी केली जात आहे. स्वच्छता कर्मचारी आपले काम नियमित करीत आहे. नियमित पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांनी देखील घराबाहेर न पडता सहकार्य करावे असे आवाहनही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.