सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी नियमांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:10+5:302021-03-13T04:56:10+5:30
तोरखेडा, वडाळी, सारंगखेडा यासारखी मोठी बाजारपेठेची गावे आपल्या कार्यक्षेत्रात आहे. त्यात रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामीण भागातून बँकेच्या कामानिमित्त, शासकीय ...

सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी नियमांचे पालन करावे
तोरखेडा, वडाळी, सारंगखेडा यासारखी मोठी बाजारपेठेची गावे आपल्या कार्यक्षेत्रात आहे. त्यात रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामीण भागातून बँकेच्या कामानिमित्त, शासकीय कार्यालयांमध्ये तसेच रोजच्या बाजारासाठी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ ये-जा करतात. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून शहरी भागांमध्ये सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असली तरी ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी आपली दुकाने सात वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवावीत. जेणेकरून कोरोना संसर्ग वाढणार नाही, त्याला पायबंद बसेल. यासाठी सर्व व्यापारीबांधवांनी सहकार्य करावे. व्यवसाय करताना स्वतः व ग्राहकांना तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व आपल्या दुकानासमोर ग्राहकांसाठी पाच फुटांचे अंतर ठेवून लाईनआऊट द्यावे. गावात व परिसरात होणारे विविध धार्मिक, लग्नसोहळे यात गर्दी करू नये. शासकीय नियमांचे पालन करून व्यवसाय व व्यवहार करावा, असे आवाहन सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी कार्यक्षेत्रातील नागरिकांना केले आहे.