शहाद्यात जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:13+5:302021-04-05T04:27:13+5:30

शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर शहरात सर्वत्र स्मशान शांतता होती. शहरातील बाजार, दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ...

Citizens respond to public curfew in martyrdom | शहाद्यात जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद

शहाद्यात जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद

शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर शहरात सर्वत्र स्मशान शांतता होती. शहरातील बाजार, दुकाने, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. शहरात दोन दिवस कुणीही रस्त्यावर फिरताना दिसत नसल्याने रस्ते निर्ममनुष्य झाले होते. शासकीय वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू होती. शहरातील मुख्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यानंतर शहादा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त पाठिंबा देत दोन दिवस घरात राहणे पसंद केल्याचे चित्र दोन दिवस दिसून आले.

शहादा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांना ही चिंतेची बाब ठरत आहे. शहादा तालुक्यात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर संख्या वाढतच आहे. शासकीय दवाखाने, कोविड सेंटर, खासगी कोविड सेंटरमध्ये बेड मिळविण्यासाठी रुग्णांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यू दर देखील वाढत असल्याने नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास पुढील काळात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहे. म्हणून नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

जनता कर्फ्यू कालावधीत प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरसे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वळवीसह, आदी अधिकारी शहरात गस्तीवर वाहनाने. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न येण्याचे आवाहन यावेळी केले. पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या, तसेच मोटारसायकलधारकांवर दंडात्मक कारवाई केली.

शहरातील बसस्थानक परिसर, शासकीय विश्रामगृह, पुरुषोत्तम मार्केट, मोहिदा रस्ता, डोंगरगाव रस्ता, मेन रोड, गांधी पुतळा, नगरपालिका परिसर, खेतिया रोड, चार रस्ता, के. स. मार्केट, जुना प्रकाशा मार्ग, तूप बाजार, सोनार गल्ली, आदी भागात दोन दिवस सर्वत्र शुकशुकाट होता. शहरातील मुख्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि बॅरिकेटिंग लावण्यात आली होती. कोरोना विषाणूची साखळी तुटावी व जनता कर्फ्यू सार्थकी व्हावा म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.

Web Title: Citizens respond to public curfew in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.