गटार सफाईसह नवीन रस्त्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:06+5:302021-03-26T04:30:06+5:30
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कॉलेज रोडवरील हुतात्मा चौक ते कॉलेज चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ...

गटार सफाईसह नवीन रस्त्याची नागरिकांची मागणी
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील कॉलेज रोडवरील हुतात्मा चौक ते कॉलेज चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर धूळ व माती उडत असते. यामुळे परिसरातील ७० टक्के नागरिकांना श्वसनाच्या त्रासासह विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हुतात्मा चौक ते कॉलेज चौफुलीपर्यंतच्या रस्त्याचे खोलीकरण करत या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे तसेच या परिसरातील गटारींची साफसफाई करण्यात येऊन त्यांना बंदिस्त करण्यात यावे. जेणेकरून या परिसरातील नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात येणार नाही. तरी आपण लक्ष घालावे ही समस्या सोडवावी, अशी मागणी दीपक बैरागी, शेखर पाटील, पीयूष वैष्णव, कीर्तीकुमार शहा, महावीर जैन, महेंद्र पाटील, डॉ. संदीप जैन, दिलीप मराठे, डॉ.जिग्नेश देसाई, जागृत टवाळे, राहुल टवाळे, रमण चौधरी, संतोष केदार आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.