संथगतीच्या कामामुळे नागरिक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:58 AM2020-01-10T11:58:23+5:302020-01-10T11:58:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील वर्षी हाती घेण्यात आलेल्या समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम आजही अर्धवटच राहिले ...

Citizens are overwhelmed by the stagnant work | संथगतीच्या कामामुळे नागरिक वेठीस

संथगतीच्या कामामुळे नागरिक वेठीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मागील वर्षी हाती घेण्यात आलेल्या समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम आजही अर्धवटच राहिले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. तर काम अपुरे राहिल्यामुळे प्रवासी व वाहनधारकांमध्येही नाराजीचा सुर उमटत आहे.
नंदुरबार तालुक्यातील तापी काठावरील गावांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी, तेथील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व दळण-वळणाच्या सुविधाही मिळाव्या यासाठी सार्वजनिक विभागामार्फत मागील वर्षी समशेरपूर ते शिंदे या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता शिंदे, खोडसगाव, वरुळ या गावांसह अन्य गावांमधून काढण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. हे काम सुरुच असले तरी ते संबंधित यंत्रणेमार्फत अत्यंत संथ गतिने केले जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.
पावसाळ्याच्या कालावधीत अर्धवट कामामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल तयार झाले होते. त्याचा नागरिकांना सामना करावा लागला होता, त्यानंतर सद्यस्थितीत प्रचंड धुळ उडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सर्वच हंगामात या रस्त्याच्या कामाला तोंड द्यावे लागत आहे. या कामाला गती देत तातडीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी ठेकेदारांकडे पाठपुरावा करुनही त्यांच्याकडून अपेक्षेनुसार लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
तर ठेकेदारांकडून योग्य काम केले जात नसल्यामुळे या रस्त्वावरुन होणाऱ्या वाहतुकीला मोठी अडचण देखील निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी जेसीबीद्वारे काम करतांना कामात योग्यता ठेवली गेली नाही. त्यामुळे अन्य वाहनधारकांना अडचण आल्याचे सागण्यात येत आहे. तर रस्त्यावरील विजेचे खांब पडण्याच्या स्थितीत असून त्याच्यापासून अनुतिच घटना घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर प्रवासी व वाहनधाकरांनाही या अर्धवट रस्त्याचा त्रास होत असून काम तातडीर्न पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Citizens are overwhelmed by the stagnant work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.