मिठ्याफळी शिवारात बिबट्याचा संचार वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:41+5:302021-07-20T04:21:41+5:30
अक्कलकुवा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात आहे. बिबट्याने आतापर्यंत लहान मोठ्या जनावरांसह शेळी, पारडे, तसेच ...

मिठ्याफळी शिवारात बिबट्याचा संचार वाढला
अक्कलकुवा परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात आहे. बिबट्याने आतापर्यंत लहान मोठ्या जनावरांसह शेळी, पारडे, तसेच इतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त केले आहे. यासाठी येथील वनविभागाचे कर्मचारी सुध्दा नेट व पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, अद्यापपावेतो बिबट्या त्यांच्या तावडीत आला नाही.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील उसाच्या शेतात तसेच मकाईच्या शेतात वारंवार बिबट्या दिसून येत असून, येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असाच जर बिबट्याचा वावर राहिला तर शेतीकामासाठी मजूर मिळणे मुश्किलीचे होईल. यासाठी वरिष्ठांनी लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करून नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.