डामरखेडय़ाजवळ गोमाईपुलावर सिनेस्टाईल रस्तालूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:43 IST2019-10-31T12:42:12+5:302019-10-31T12:43:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा ते शहादा रस्त्यावर डामरखेडाजवळील गोमाई नदीच्या पुलावरुन मार्गस्थ होणा:या दुचाकीवरील महिलेची पर्स ओढून ...

डामरखेडय़ाजवळ गोमाईपुलावर सिनेस्टाईल रस्तालूट
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रकाशा ते शहादा रस्त्यावर डामरखेडाजवळील गोमाई नदीच्या पुलावरुन मार्गस्थ होणा:या दुचाकीवरील महिलेची पर्स ओढून चोरटय़ाने पळ काढला़ बुधवारी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास हा सिनेस्टाईल चोरीचा प्रकार घडला़ पर्स ओढून चोरटा थेट शेतात पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितल़े
डामरखेडा येथील अनिता श्रीकृष्ण पाटील ह्या हाटमोहिदे ता़ नंदुरबार येथून मुलासोबत मोटारसायकलने डामरखेडा गावाकडे जात होत्या़ पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांची मोटारसायकल गोमाई पुलावरुन जात असताना पुलाच्या दुस:या बाजूला कठडय़ाजवळ लपून बसलेल्या एकाने कठडय़ावरुन उडी घेत अनिताबाई यांच्या ताब्यात पर्स ओढून घेतली़ पर्स ओढली गेल्याने अनिताबाई ह्या खाली पडल्या़ ही बाब त्यांच्या मुलाच्या लक्षात आल्याने त्याने थांबून आरडाओरड केली़ यावेळी मागून येणा:या वाहनधारकांचे लक्ष असल्याने त्यांनी वाहन थांबवत शेतात पळून जाणा:या चोरटय़ाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला़ परंतू चोरटा शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाला़ दरम्यान घटनेनंतर प्रकाशा दूरक्षेत्राचे कर्मचारी तसेच डामरखेडा येथील श्रीकृष्ण पाटील व शेतक:यांनी शेताला वेढा देत चोरटय़ाचा शोध घेतला असता, पर्स आढळून व त्यातील मोबाईल आढळून आला़ पर्समधील साडेतीन हजार रोख, सोन्याचे दागिने तसेच इतर सामान चोरी गेल्याची माहिती देण्यात आली आह़े
शहादा तालुक्यातील पिंगाणे येथेही दोन दिवसांपूर्वी असाच प्रकार घडल्याची माहिती आह़े लुटीच्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भिती व्यक्त होत आह़े