चॉकलेट पावडर झाली अवघड जागेचे दुखणे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:41+5:302021-06-18T04:21:41+5:30

फुकटची मिळालेली कोको आणि चॉकलेट पावडर घरी तर घेऊन गेले, परंतु तिचे काय करायचे? या विवंचनेत अनेक कुटुंब सध्या ...

Chocolate powder became difficult place pain ... | चॉकलेट पावडर झाली अवघड जागेचे दुखणे...

चॉकलेट पावडर झाली अवघड जागेचे दुखणे...

फुकटची मिळालेली कोको आणि चॉकलेट पावडर घरी तर घेऊन गेले, परंतु तिचे काय करायचे? या विवंचनेत अनेक कुटुंब सध्या नवापूर परिसरात आहेत. काहींनी ती विक्री करण्याचा प्रयत्नही केला, परंतु दुकानदारही त्यांना थारा देत नसल्याने चॉकलेट पावडर टाकून देण्याची वेळ आता अनेक कुटुंबांवर आली आहे. त्याचे असे झाले... मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी एक कंटेनर निघाला. पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरील चरणमाळ घाटात कंटनेरचा अपघात झाला. अपघातात कंटेनरमधील कोको आणि चॉकलेट पावडरचे तब्बल साडेपाचशे खोके रस्त्यावर आणि इतरत्र विखुरले. कंटेनरमध्ये केवळ चालक आणि सहचालक असल्याने आणि ते अपघातामुळे घाबरलेले असल्याने एवढे बॉक्स गोळा करणे त्यांना शक्य झाले नाही. परिणामी, रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांनी हे बॉक्स घेऊन पोबारा केला. त्यात काय आहे याची शहानिशा न करता एकाने बॉक्स उचलला हे पाहून इतरांनीही मिळेल तेवढे बॉक्स घेऊन पोबारा केला. परंतु घरी आणल्यावर त्या चॉकलेट आणि कोको पावडरचे करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडला. परिसरातील अनेक घरांमध्ये ही स्थिती निर्माण झाली. ज्यांना थोडीफार माहिती होती त्यांनी त्याचा उपयोग केला. काहींनी बॉक्स विक्री करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस कारवाई होईल म्हणून तो बेतही रद्द करावा लागला. चॉकलेट पावडर आता अनेक कुटुंबांमध्ये अवघड जागेचे दुखणे झाले आहे.

Web Title: Chocolate powder became difficult place pain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.