चिंचपाडा येथे घरफोडीत ५० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:35 IST2020-01-01T12:35:31+5:302020-01-01T12:35:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घराची कूडाची भिंत तोडून ५० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना ...

चिंचपाडा येथे घरफोडीत ५० हजारांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घराची कूडाची भिंत तोडून ५० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली.
चिंचपाडा येथे चोरट्यांनी गोविंद नुरजी वसावे यांच्या घराची कूडाची भिंत तोडून सोन्या-चांदीचे दागिने व १४ हजार रुपये रोख असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एक तासानंतर या चोरट्यांनी वडखुट रेल्वेगेटजवळील सुनील शांतीलाल वसावे व परशुराम आनंदा वसावे रा.चिंचपाडा यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांची रहिवाशांना चाहूल लागल्याने त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले.
याआधीही चिंचपाडा व परिसरात वाहनांच्या बॅटऱ्या, शेळी-बोकड, मोटारसायकल, कृषीपंप चोरीच्या घटना घडल्या असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.