चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल कोरोनाच्याच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST2021-06-16T04:41:00+5:302021-06-16T04:41:00+5:30
चिंचपाडा येथे अनेक दशकांपासून सेवा देत असलेले ख्रिश्चन रुग्णालयाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. या रुग्णालयातील सर्व ...

चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल कोरोनाच्याच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार
चिंचपाडा येथे अनेक दशकांपासून सेवा देत असलेले ख्रिश्चन रुग्णालयाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचे प्राण वाचवले. या रुग्णालयातील सर्व स्टाफने रुग्णांची चांगली सेवा केल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतु काही रुग्णांनी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासंदर्भात थोडी नाराजीदेखील व्यक्त केली आहे.
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी चर्चा होत असताना चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रत्युत्तर देण्याकरिता तयार असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपकसिंग यांनी सांगितले. नवापूर तालुक्यातील खासगी एकमेव चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्यात आला असून, ऑक्सिजनची कमतरता या ठिकाणी फारशी जाणवणार नाही. ख्रिश्चन हॉस्पिटल ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्णदेखील झाले आहे.
रुग्णालयातील डॉ. सुनीता सिंग यांनी रुग्णांना प्रेमाची वागणूक दिली असली तरी त्याच रुग्णालयातील डॉ. दीपक सिंग यांनीदेखील रुग्ण व नातेवाईकांना प्रेमाची वागणूक देणे अपेक्षित आहे. मागील अनुभवातून आपण शिकले पाहिजे व पुढे येणाऱ्या साथीच्या रोगांना सामोरे जाण्यासाठी तयार असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याकरिता प्रशासनाने वेळोवेळी आखून दिलेले नियम आपण पाळणे आवश्यक आहे.