मिरची व कापसाला पुन्हा अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:33 IST2019-11-04T13:33:44+5:302019-11-04T13:33:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 24 तासात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान ...

Chilli and cotton are again a premature hit | मिरची व कापसाला पुन्हा अवकाळीचा फटका

मिरची व कापसाला पुन्हा अवकाळीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात गेल्या 24 तासात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आह़े शनिवारी पहाटे ते रविवार पहाट या दरम्यान जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली़ 
तळोदा तालुक्यात शनिवारी पहाटेपासून कमी अधिक तसेच तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ यात मका, ज्वारी, कापूस या पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आह़े ब:याच जणांचा मका आणि ज्वारी उघडय़ावर पडून असल्याने सडत असल्याची माहिती शेतकरी देत आहेत़ 
दरम्यान दुपार्पयत तळोदा व शहादा तालुक्यातील काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला होता़ सायंकाळपासून नंदुरबार शहरासह ठिकठिकाणी उशिरार्पयत पावसाने हजेरी लावली होती़ यातून पिकांचे ब:याचअंशी नुकसान झाल्याचे समोर आले आह़े पावसाचा सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतक:यांना बसत असून नंदुरबार तालुक्यात उशिराने कापूस लागवड केल्याने अद्यापही झाडांवर लगडलेली बोंडं फुटलेली नाहीत़ पावसामुळे बोंड गळून पडणे किंवा काळे पडण्याचे प्रकार घडत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े तालुक्यातील मिरची उत्पादकांची स्थितीही पावसाच्या हजेरीने गंभीर झाली आह़े रात्री उशिरार्पयत मध्यम प्रकारच्या सरी कोसळत असल्याने शेतात पाणी साचल्याचे दृश्यही सकाळी पाहवयास मिळाले होत़े मिरची ऐन भरात असताना पाऊस हजेरी लावत असल्याने पांढरी माशी आणि चुरडामुरडा वाढत असल्याचे दिसून आले आह़े रविवारी सायंकाळीही नंदुरबार तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत होत़े 

रात्री 9 नंतर नंदुरबार शहरात सुरु झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हा मिरची व्यावसायिकांना बसला़ दुपारी ऊन असल्याने वळणरस्त्यालगत जागोजागी मिरची सुकवण्यासाठी टाकली गेली होती़ परंतू रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर व्यापा:यांची धांदल उडाली़ 
 

Web Title: Chilli and cotton are again a premature hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.