लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरात लावलेल्या वॉटर एटीएममधून चिल्लर चोरीला गेल्याची घटना २५ डिसेंबर रोजी घडली होती़ याप्रकरणी शनिवारी रात्री शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एटीएममध्ये ९०० रुपयांची चिल्लर होती़सप्तशृंगी माता मंदिरासमोर बसवलेल्या वॉटर एटीएम २५ डिसेंबर रोजी पहाटे फोडून चोरट्यांनी त्यातील चिल्लर चोरुन नेली होती़ हे वॉटर एटीएम पालिकेने खाजगी तत्त्वावर चालवण्यासाठी दिले आहेत़ एटीएम फोडून चोरी झाल्यानंतर संबधित कंपनीला माहिती देण्यात आली होती़ त्यानुसार कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद गणपत वाघ रा़ मलोणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात ९०० रुपयांची चिल्लर चोरी करुन नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहाद्यातील वॉटर एटीएममधून ९०० रुपयांची चिल्लर चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:50 IST