लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील बाजारपेठेत यंदा मिरची आवक घटल्याने चिली फिव्हर ओसरल्याचे दिसून आले आह़े दर दिवशी किमान एक हजार क्विंटल होणारी आवक केवळ 400 क्विंटलवर आल्याने मार्केट यार्डात शुकशुकाट आह़े यंदा सरासरी पजर्न्यमान झाले असले, तरी पावसाच्या लहरीपणावर विसंबून न राहता शेतक:यांनी इतर खरीप पिकांच्या पेरणीचा निर्णय घेतला होता़ यामुळे मिरची लागवड कमी होऊन जिल्ह्यात मिरची आवकवर प्रचंड परिणाम झाला आह़े दिवाळीनंतर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा रेड चिली फिव्हर यंदा दिसून आला नाही़ आवक कमी असतानाही दर स्थिर आहेत़ तरीही आवक कमीच असल्याने व्यापारीही हैराण झाले आहेत़ गेल्या काही दिवसांपासून भाजीबाजारात हिरव्या मिरचीची आवक पूर्णपणे बंद झाल्याने शेतक:यांनी तोडा करून मिरची विक्री सुरू केली होती़ परिणामी भाजीपाला बाजारात आवक वाढून बाजारसमितीत मिरची कमी झाली आह़े गेल्या महिनाभरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेली मिरची ही नगण्य असल्याने व्यापारीही अडचणीत आले आहेत़ यामुळे काही उद्योजकांकडे मजूरांना देण्यासाठी पैसेही निघत नसल्याची स्थिती आह़े मिरची बाजारापेठेत ही स्थिती कायम राहिल्यास लाल मिरचीची आवक कमी होऊन पूरक उद्योग यंदा धोक्यात येण्याची शक्यता आह़े
नंदुरबार बाजारातील ‘चिली फिव्हर’ फिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:15 IST
दर वाढीची अपेक्षा : हिरव्या मिरचीची विक्री वाढल्याने लाल मिरचीवर परिणाम
नंदुरबार बाजारातील ‘चिली फिव्हर’ फिका
ठळक मुद्देनंदुरबार तालुक्यात लागवड घटली यंदा नंदुरबार जिल्ह्यात एकूण 2 हजार 24 हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली होती़ यात प्रामुख्याने नंदुरबार तालुक्यात लागवड होणारी मिरची बाजारात सर्वाधिक खरेदी होत़े नंदुरबार तालुक्यात दरवर्षी सरासरी 1 हजार 900 किंवा त्यापेक्षा अ