ट्रॅक्टर उलटल्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 20:47 IST2019-04-29T20:47:23+5:302019-04-29T20:47:53+5:30

चालकाविरोधात गुन्हा : अक्कलकुवा तालुक्यातील घटना

The child's death by reversing the tractor | ट्रॅक्टर उलटल्याने बालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर उलटल्याने बालकाचा मृत्यू


नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील सांबर येथे ट्रॅक्टर उलटून तीन वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडली़ ट्रॅक्टर उतारावरुन मागे सरकून उलटल्याने हा अपघात घडला़
वेरी, ता.अक्कलकुवा येथील मोतीराम दाज्या वसावे यांचे सांबर शिवारात शेत आहे़ शुक्रवारी दुपारी ते मुलांसह शेतात गेले असता त्याठिकाणी मगन रान्या वसावे याने एमएच ३९ एन २७०७ हे ट्रॅक्टर उभे केले होते़ त्यावर मोतीराम वसावे यांचा मुलगा राकेश वसावे हा तीनवर्षीय बालक खेळत होता़ दरम्यान उतारावर लावलेल्या ट्रॅक्टरची हालचाल झाल्याने ते मागे सरकण्यास सुरुवात झाली यात त्याचा वेग वाढून खड्ड्यात उलटले़ यातून ट्रॅक्टरवर खेळणारा राकेश हा दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला होता़ त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ शनिवारी रात्री उशिरा मोतीराम दाज्या वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरचालक मगन वसावे रा़ भगदरी ता़ अक्कलकुवा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास हवालदार बागुल करत आहेत़ चालक मगन वसावे याने ट्रॅक्टर शेतातील उतारावर उभे करताना चाकाला मागील बाजूस कोणत्याही प्रकारचा आधार न लावल्याने टॅक्ट्रर तात्काळ मागे जावून उलटल्याचे सांगण्यात आले आहे़ घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती़
 

Web Title: The child's death by reversing the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.