माळ्यावरून पडल्याने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 21, 2017 15:18 IST2017-06-21T15:18:36+5:302017-06-21T15:18:36+5:30
माळ्यावर चारा ठेवत असताना खाली पडून 12 वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना वेरी ता़ अक्कलकुवा येथे घडली होती़

माळ्यावरून पडल्याने बालकाचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.21 : माळ्यावर चारा ठेवत असताना खाली पडून 12 वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना वेरी ता़ अक्कलकुवा येथे घडली होती़ या बालकावर गुजरात राज्यातील सुरत येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़
वेरी येथील अनिल फोत्या वसावे हा 12 वर्षीय बालक 25 मे रोजी माळ्यावर चारा ठेवत असताना पाय घसरून जमिनीवर पडला़ यात त्याला मार लागला होता़ त्याला उपचारार्थ सुरत येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े उपचार सुरू असताना 28 मे रोजी त्याचा मृत्यू झाला होता़