पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:08+5:302021-08-17T04:36:08+5:30

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ...

Chief Government flag hoisting at the hands of Guardian Minister ADKC Padvi | पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी मनीषा

खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार

प्रदान करण्यात आले. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तळोदा पंचायत समितीस प्रथम, शहादा द्वितीय आणि नंदुरबार

पंचायत समितीस तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर राज्य पुरस्कृत आवास

योजनेसाठी नवापूर पंचायत समितीस प्रथम, नंदुरबार द्वितीय आणि शहादा पंचायत समितीस

तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य

योजनेत उल्लेखनीय कामगिरीसाठी मेडिकल सर्जिकल ॲण्ड डेन्टल हॉस्पिटल नंदुरबार, सुश्रुत नर्सिंग होम शहादा आणि पटेल सर्जिकल ॲण्ड एन्डोस्कोपी क्लिनिक नंदुरबार यांना ॲड.पाडवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कृषी संजीवनी महोत्सव अंतर्गत उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कामे करणाऱ्या दिलीप गावीत,

उमेश भदाणे, प्रवीण गावीत या कृषी सहायकांना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार

हमी योजनेंतर्गत उच्चतम फळबाग लागवड क्षेत्र करण्यासाठी कृषी सहायक प्रवीण गावीत

आणि उर्मिला गावीत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जि.प.समाजकल्याण सभापती रतन पाडवी,

महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, महेश सुधळकर, बालाजी क्षीरसागर आदी उपस्थित होते.

Web Title: Chief Government flag hoisting at the hands of Guardian Minister ADKC Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.