प्रत्येक अंगणवाडीत बालकांची तपासणी करा : विभागीय आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:26+5:302021-06-24T04:21:26+5:30
गांभीर्याने प्रयत्न करावेत आणि बालकांच्या आरोग्य तपासणीविषयी माहिती घेण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीला भेट द्यावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण ...

प्रत्येक अंगणवाडीत बालकांची तपासणी करा : विभागीय आयुक्त
गांभीर्याने प्रयत्न करावेत आणि बालकांच्या आरोग्य तपासणीविषयी माहिती घेण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीला भेट द्यावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी बालकांच्या आरोग्य तपासणीचा दैनंदिन आढावा घ्यावा. प्रत्येक बालकाचे वजन आणि उंची मोजली जाईल याची खात्री करावी. अतितीव्र कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी गरजेनुसार त्रिस्तरीय उपचार सुविधेचा उपयोग करावा.
पहिल्या टप्प्यात उपचारानंतरही वजनात सुधारणा होत नसल्यास अशा बालकांना पोषण व पुनर्वसन केंद्रात दाखल करावे. अपूर्ण असलेल्या अंगणवाडी इमारतींची कामे त्वरित पूर्ण करावी. प्रत्येक अंगणवाडीला स्वतःची इमारत राहील याबाबत आवश्यक नियोजन करावे. प्रत्येक महिन्यात कुपोषणाबाबत आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्त गमे यांनी बैठकीत विविध विषयांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी. वसुंधरा अभियानात शहादा आणि प्रकाशा गावाने क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी मागील वर्षातील त्रुटी दूर कराव्यात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवावा. पावसाळ्यात वृक्षलागवडीची कामे मोठ्या प्रमाणात घ्यावी. मतदार छायाचित्र संकलनाचे प्रलंबित काम गावनिहाय आढावा घेऊन पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.