बोगस बियाणे रोखण्यासाठी कृषी विभागाकडून 23 नमुन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:17 IST2019-06-18T21:17:02+5:302019-06-18T21:17:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळात होरपळलेल्या शेतक:यांची बोगस बियाण्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विक्री सुरु होण्यापूर्वीच ...

बोगस बियाणे रोखण्यासाठी कृषी विभागाकडून 23 नमुन्यांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुष्काळात होरपळलेल्या शेतक:यांची बोगस बियाण्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून विक्री सुरु होण्यापूर्वीच विविध कंपन्यांच्या 23 बियाणे नमुने संकलित करुन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत़ तपासणी अहवाल येत्या 15 दिवसात सादर होणार आह़े
जिल्ह्यात यंदा एकूण 2 लाख 18 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड होणार आह़े अद्याप पाऊस सुरु झालेला नसल्याने ग्रामीण भागात शुकशुकाट आह़े परंतू विविध बियाणे कंपन्यांच्या नावाने एजंट गावोगावी शेतक:यांच्या भेटी घेत त्यांना बीटीसह धान्य आणि तृणधान्यांच्या वाणाचे बियाणे स्वस्त दरात देण्याचे अमिष दाखवत असल्याने कृषी विभाग सजग झाला आह़े विभागाने नियुक्ती केलेली जिल्हास्तरावरील एक आणि तालुकास्तरावरील सहा पथके ग्रामीण भागात भेटी देत आहेत़ जिल्ह्यात यंदा बीटी कापूस बियाण्याची 2 लाख 80 हजार पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ 450 बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या या पाकिटांची अद्यापही संथगतीने विक्री सुरु असून पावसाच्या हजेरीनंतर वेग वाढण्याची शक्यता आह़े जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील याच्या मार्गदर्शनात नियुक्त केलेल्या पथकांनी वडाळी ता़ शहादा आणि नंदुरबार शहरातून बोगस बियाणे जप्तीची कारवाई केली आह़े सोबतच कापूस बियाण्यांची 23 आणि खताचे 16 नमुने गोळा करुन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आह़े
जिल्ह्यात 2017 मध्ये नंबर 9 ज्वारीच्या बोगस वाणामुळे शेतकरी नापिकीला सामोरे गेले होत़े ही स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून पेरणीपूर्वी बियाणे आणि खतांचे नमुने घेत आहेत़ त्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येऊन बियाणे बोगस असल्यास कंपनी, ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करुन न्यायालयात खटला चालवला जात आह़े 2017-18 च्या खरीप हंगामात संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 3 नमुन्यांमध्ये दोष आढळला होता़ यातून संबधित कंपनीसह विक्रेत्यांविरोधात सध्या न्यायालयात खटला सुरु आह़े