आसाणे येथे फसवणूक करणा:याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:01 IST2018-03-05T13:01:32+5:302018-03-05T13:01:32+5:30
गंभीर : बैलजोडीची केली विक्री

आसाणे येथे फसवणूक करणा:याविरोधात गुन्हा
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : तालुक्यातील आसाणे येथील एकाची बैलजोडी विक्री करून त्याचे पैसे न देताच फसवणूक करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयिताकडून वर्षभरापासून पैशांसाठी फिरवाफिरव सुरू होती़
आसाणे येथील संतोष पंडीत पाटील यांनी मे 2017 मध्ये त्यांच्या मालकीची बैलजोडी विजय अजरुन तांबोळी याच्यामार्फत विक्री केली होती़
बैलांच्या विक्रीचे पैसे विजय तांबोळी याने ठेवून घेतले होत़े हे पैसे मिळावेत यासाठी गेल्या महिन्यांपासून संतोष पाटील हे तांबोळी यांच्याकडे चकरा मारत होत़े
परंतु दरवेळी तांबोळी हे त्यांना काही ना काही कारण देत, त्यांची फिरवाफिरव करीत असल्याचे सांगण्यात आल़े
दरम्यान, वारंवार पैसे मागणूनही याचा उपयोग होत नसल्याने संबधित व्यक्ती पैसे देणार नसल्याची खात्री पटल्यानंतर संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात विजय तांबोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बुनकर करत आहेत़