सिनेस्टाईल पाठलाग करून नवापुर पोलिसांनी दुचाकी चोरांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:14 IST2019-07-19T11:14:00+5:302019-07-19T11:14:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापुरात रात्री दुचाकी चोरीचा प्रय} करणा:या तिघांना पेट्रोलिंग करणा:या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या साथीदारासह ...

Chasing Cinecastle, Navapura police arrested the two thieves | सिनेस्टाईल पाठलाग करून नवापुर पोलिसांनी दुचाकी चोरांना केली अटक

सिनेस्टाईल पाठलाग करून नवापुर पोलिसांनी दुचाकी चोरांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापुरात रात्री दुचाकी चोरीचा प्रय} करणा:या तिघांना पेट्रोलिंग करणा:या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या साथीदारासह एकुण चौघांनी आठ दुचाकी काढून दिल्या असून त्यांच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांमध्ये हेमंत अनिल सोनवणे रा.धनेर, ता.साक्री,  रविंद्र आनंदा पवार रा.बाबुळदे, ता.साक्री व  संदिप भिलु चौरे रा.मंचमाळ, ता.साक्री यांचा समावेश आहे. नवापूर पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असतांना जनतापार्क भागात एका संशयीत मोटार सायकलवर तीनजण  दिसले. पोलिसांना पहाताच ते पळाले. या तिघांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले.  त्यांची चौकशी केली असता ते मोटार सायकल चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक माहीती विचारली असता त्यांनी दुसरे दोन आरोपींची माहीती पोलीसांना दिली. पोलिसांनी त्यांचा राहत्या गावी जावून त्यांच्याकडुन शेतात लपविलेल्या व घरी ठेवलेल्या एकुण आठ मोटार सायकली जप्त केल्या.
 दुसरे संशयीत आरोपी अनिल पवार याला नाशिक येथुन तर जितेंद्र रंजीत पवार यास वाल्हवे, ता.साक्री येथून ताब्यात घेतले. अनिल पवार याने नवापूर, शहादा, विसरवाडी व नाशिक येथून चोरलेल्या आठ मोटार सायकली काढुन दिलेल्या आहेत. यातील सर्व आरोपी हे शिक्षण घेत असतांना मित्र झाले होते. पुढे महागडया गाडया फिरवण्याची हौस म्हणुन त्यांनी मोटार सायकली चोरी केलेल्या होत्या. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, फौजदार पठाण, दादाभाई वाघ, पोलीस कर्मचारी रितेश इंदवे, योगेश थोरात, अनिल राठोड, चव्हाण, तनपुरे  यांनी केली.
दरम्यान, नवापूरचे पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी यापूर्वी देखील दुचाकी चोरटय़ांना अटक करून त्यांच्याकडून अनेक दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत. 
 

Web Title: Chasing Cinecastle, Navapura police arrested the two thieves