आरोग्यसेवेच्या चार प्रमुख पदांची जबाबदारी प्रभारींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:06 IST2019-11-23T13:06:50+5:302019-11-23T13:06:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामीण भागात मोलाचे कार्य बजावण्यासाठी कुष्ठरोग, क्षयरोग, माता व बाल ...

आरोग्यसेवेच्या चार प्रमुख पदांची जबाबदारी प्रभारींवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामीण भागात मोलाचे कार्य बजावण्यासाठी कुष्ठरोग, क्षयरोग, माता व बाल संगोपन विभाग आणि अतीरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अशी चार पदे मंजूर करण्यात आली आह़े परंतू या पदांसाठी ‘अ’ दर्जाचे अधिकारीच नसल्याने प्रभारी अधिका:यांवर या विभागांचा कारभार सुरु आह़े
सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमधील 59 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 290 उपकेंद्रांच्या माध्यमातून जिल्हा आरोग्य विभाग रुग्णसेवा देत आह़े या रुग्णसेवेला बळ देण्यासाठी शासनाकडून वेळावेळी आरोग्य विभागात प्रशिक्षित तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात येतात़ परंतू नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षापासून रिक्त पदांची संख्या वाढत असून येथील आरोग्य विभागाने पाठपुरावा करुनही आरोग्य संचालनालय वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची योग्य ती कारवाई करत नसल्याचे दिसून आले आह़े परिणामी चार प्रमुख विभागांसोबतच आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी (गट अ) आणि (ब) यांची आठ पदे रिक्त आहेत़ यातून या आरोग्य केंद्रांची जबाबदारी ही इतर अधिका:यांवर देण्यात आल्याने तेथे सध्या ‘प्रभारीराज’ सुरु असल्याचे दिसून आले आह़े जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सध्या पूर्णवेळ अधिकारी हे नियुक्त आहेत़ त्यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (गट ब), सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी अर्थात माता व बालसंगोपन अधिकारी, सहायक संचालक कुष्ठरोग विभाग आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी हे चार पदे निर्माण करण्यात आली आहेत़ या पदांच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून आरोग्य सेवा अधिक बळकट केली जात़े यातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद रिक्त आह़े माता व बालसंगोपन अधिकारी म्हणून 2 जुलै 2018 रोजी डॉ़सचिन सुरेशराव रामढबे यांची बदली करण्यात आली होती़ परंतू ते वर्ष उलटूनही नंदुरबारला हजर झालेले नाहीत़ त्यामुळे या पदावर सध्या प्रभारी अधिकारी काम पाहत आहेत़ दुसरीकडे सहायक संचालक कुष्ठरोग व जिल्हा क्षयरोग अधिकारी या दोन पदांवर एकच प्रभारी अधिकारी नियुक्त आहेत़ मूळ राजबर्डी ता़ धडगाव येथील प्राथमिक आरोग्य नियुक्त असलेले संबधित अधिकारी हे कुष्ठरोग आणि क्षयरोग हे दोन्ही विभाग सांभाळत असल्याने राजबर्डी आरोग्य केंद्रात अडचणी वाढल्या आहेत़ कुष्ठरोग विभागात यापूर्वी नियुक्त असलेल्या महिला जिल्हा आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी 1, अतीरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, साथरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट अ आणि ब अशी एकूण 170 पदे मंजूर करण्यात आली आहेत़ यापैकी 157 पदांवर अधिकारी नियुक्त असून ते जिल्ह्यात काम करत आहेत़ उर्वरित 13 पदे रिक्त आहेत़ यात प्रमुख चार पदांसह प्रशासकीय अधिकारी गट ब, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांची तसेच आठ वैद्यकीय अधिका:यांची पदे रिक्त आहेत़ धनाजे ता़ धडगाव, प्रकाशा ता़ शहादा, सोमावल ता़ तळोदा, मंदाणे ता़ शहादा याठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ तर मांडवी, चुलवड व बिलगाव ता़ धडगाव आणि कंजाला ता़ अक्कलकुवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ब यांची चार पदे रिक्त आहेत़ यामुळे येथे एक प्रभारी अधिकारी नियुक्त करुन काम सुरु ठेवण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आह़े वैद्यकीय अधिकारीचे प्रभारी पद काढून अचानक क्षयरोग विभागाच्या प्रभारींना दिल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात आले होत़े या चारही पदांसाठी अ वर्गाचे अधिकारी जिल्ह्यात येण्यास इच्छुक नसल्याने या पदांची जबाबदारी वर्षानुवर्षे प्रभारी वैद्यकीय अधिका:यांवर टाकली गेली आह़े