स्त्रियांच्या आरोग्याकडे बघण्याचा बदलला दृष्टिकोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:15+5:302021-03-04T04:59:15+5:30
घरातले सुखी तर मी सुखी असे स्त्रियांकडून नेहमीच सांगितले जाते. परंतु आता घरच्या सदस्यांकडून तिच्या आरोग्याविषयी काळजी घेतली जात ...

स्त्रियांच्या आरोग्याकडे बघण्याचा बदलला दृष्टिकोन
घरातले सुखी तर मी सुखी असे स्त्रियांकडून नेहमीच सांगितले जाते. परंतु आता घरच्या सदस्यांकडून तिच्या आरोग्याविषयी काळजी घेतली जात असून, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याची होणारी आबाळ थांबण्यास मदत होणार आहे.
स्त्रियांना आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांचीही मोलाची साथ
स्त्रियांना आपल्या आरोग्याची काळजी घेताना ग्रामीण भागात आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांची मोलाची साथ मिळत असून, प्रसूतीपूर्व तपासणी, उपचार, लसीकरण तसेच सुरक्षित प्रसूती व नंतर बालकांचे लसीकरण याबाबत ते महत्त्वाचे मार्गदर्शन करीत असल्याने स्त्रियांचे तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत आहे.
घरातील कुणीही आजारी पडले की, त्या आजारी व्यक्ती, बालक यांची सेवा जसे दवाखान्यात नेणे, औषधे देणे, त्यांचे कपडे बदलणे, पौष्टिक आहार देणे ही सर्व कामे घरातील स्त्रीलाच करावी लागत होती. परंतु आता कुटुंबातील सदस्यांकडूनही स्त्रियांना कामे करताना मदत होऊ लागल्याने स्त्रियांना आपल्या आजाराकडे, शारीरिक बदलाकडे लक्ष देण्यास वेळ मिळू लागला आहे.