चॅम्पियन ऑफ डेमोक्रसीने मतदानाचा टक्का वाढेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:23 IST2019-09-27T12:22:50+5:302019-09-27T12:23:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 12 लाख 24 हजार 429 मतदार असून त्यासाठी एक हजार ...

चॅम्पियन ऑफ डेमोक्रसीने मतदानाचा टक्का वाढेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 12 लाख 24 हजार 429 मतदार असून त्यासाठी एक हजार 385 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. मतदानाची प्रक्रिया सुलभ व पारदर्शी करण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध प्रयोग राबविण्यात येणार असून त्याला निश्चित यश मिळेल. नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निष्पक्ष व पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्यादृष्टीने मायक्रोप्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यावेळी ‘चॅम्पियन ऑफ डेमोक्रसी’ म्हणून मतदान कर्मचा:यांसाठी स्पर्धा राबवण्यात येणार असून त्याचा चांगला फायदा मिळेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला़ विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांच्याशी झालेला संवाद असा़
प्रश्न : मतदान प्रक्रिया पारदर्शी राबवण्यासाठी तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न काय आहेत?
डॉ.राजेंद्र भारुड : नंदुरबार जिल्ह्यातील काही भाग दुर्गम व अती दुर्गम भागात आहेत़ जिल्ह्यात आदिवासी मतदारांची संख्या अधिक आह़े गेल्या काही निवडणूकांच्या मागोवा घेतल्यास आदिवासी ग्रामीण भागात मतदान ब:यापैकी होत़े पण शहरी भागात व मोठय़ा गावांमध्ये मात्र उदासिनता दिसून येत़े हा पूर्वानुभव पाहता, शहरी भागात मतदान टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन केले आह़े जिल्ह्यातील प्रत्येक घरार्पयत जाऊन मतदानाची जागृती करण्याचे नियोजन आह़े मतदान कर्मचा:यांसाठी यावेळी स्पर्धा आयोजित करुन जे कर्मचारी व अधिकारी सर्वाधिक मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्न करतील, ज्यांचे काम उत्कृष्ट असेल अशांना चॅम्पियन ऑफ डेमोक्रसीने गौरवण्यात येईल़ तसेच मतदान जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर नियोजन केले आह़े
प्रश्न : अतिदुर्गम भाग व नर्मदा काठावरील मतदानासाठी कसे नियोजन आहे?
डॉ.राजेंद्र भारुड : जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात डोंगराळ व अतीदुर्गम भागातील मतदान केंद्रांवर खास सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत़ मुखडी, भादल व झापी या तीन ठिकाणी तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात येईल़ विशेषत: मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, डनेल, मुखडी, उडद्या, भादल आणि झापी या नऊ केंद्रांवर मतदान कर्मचा:यांना पाठवण्यासाठी बाजर्चा वापर करण्यात येणार आह़े
प्रश्न : आचारसंहिताचे काटेकोर पालन करण्याच्यादृष्टीने नियोजन काय आहे?
डॉ.राजेंद्र भारुड : आदर्श आचारसंहिता राबवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आह़े या कक्षाच्या मतदारांना संपर्कासाठी 02564-210777 हा दूरध्वनी क्रमांक असून तेथे मतदारांना आचारसंहितेचा कुठे, भंग होत असेल तर त्याच्या तक्रारी करता येतील़ तसेच फ्लाईंग स्कॉड, व्हिडीओ सव्र्हेलियन्स टिम, स्टॅटिक सव्र्हेलियन्स टीम, व्हीडिओ व्ह्युईंग टीम तसेच विविध पथक नेमण्यात आले आह़े निवडणूकीसाठी सीव्हीआयज ीआयएल अॅप वापरण्यात येणार असून त्याद्वारेही नागरिकांना आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात येणार आह़े
प्रश्न : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काय प्रयत्न झाले?
डॉ.राजेंद्र भारुड : नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर आह़े त्या दृष्टीने बॉर्डर बैठका झाल्या आहेत़ दोन्ही राज्यातील सिमांवर विशेष लक्ष राहणार आह़े याशिवाय इतर कारवाई सुरु आह़े जेजे शक्य त्या सर्व उपाययोजना करण्याचे नियोजन झाले असून त्यादृष्टीने काम सुरु आह़े जनतेही मतदान प्रक्रिया सुलभ व पारदर्शी व्हावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आह़े