नवापुरात एकावर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:58 IST2019-11-02T12:58:20+5:302019-11-02T12:58:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर शहरातील देवळफळी चौफुली येथे किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला झाला़ गुरुवारी रात्री आठ वाजेच्या ...

नवापुरात एकावर चाकूहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर शहरातील देवळफळी चौफुली येथे किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला झाला़ गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
इम्तीयाज मोहम्मद पठाण याने त्याच्या बदल्यात ड्रायव्हर म्हणून जातो का, अशी विचारणा मोहसीन सलीम शेख रा़ देवळफळी याला केली होती़ याचा राग आल्याने मोहसीन गुरुवारी देवळफळी भागातून दुचाकीने जाणा:या इम्तियाज पठाण याला थांबवून शिवीगाळ करत खिशातील चाकू काढून वार केला़ यावेळी पठाण याच्यासोबत उभा असलेल्या अविनाश दामू बि:हाडे याने पुढे येत हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली़
याबाबत इम्तियाज पठाण याने नवापुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मोहसीन सलीम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ करत आहेत़