महिला महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:23+5:302021-06-09T04:38:23+5:30
नांदेडकर यांनी व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय दुर्मीळ आणि उल्लेखनीय माहिती दिली, तर प्राचार्य डॉ. सोपान बोराटे यांनीही ...

महिला महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा
नांदेडकर यांनी व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय दुर्मीळ आणि उल्लेखनीय माहिती दिली, तर प्राचार्य डॉ. सोपान बोराटे यांनीही माहिती दिली. प्रा. डॉ. कैलास चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मंगला चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. योगेश भुसारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रा. मंगला चौधरी, प्रा. काकासाहेब अनपट, प्रा. योगेश भुसारे, प्रा. खेमराज पाटील, प्रा. डॉ. जयेश गाळणकर, प्रा. रेणुका पाटील, प्रा. मंगला पाटील, प्रा. रवींद्र खेडकर, प्रा. दीपिका पटेल व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हा. चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए. के. पाटील, तर संस्थेचे संचालक अभिजित एम. पाटील, महाविद्यालयाचे समन्वय व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.