शिक्षक दिन आणि स्मृतिदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:54+5:302021-09-06T04:34:54+5:30
वैभव विद्यालय, वाण्याविहीर वाण्याविहीर (ता. अक्कलकुवा) येथील सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात ...

शिक्षक दिन आणि स्मृतिदिन साजरा
वैभव विद्यालय, वाण्याविहीर
वाण्याविहीर (ता. अक्कलकुवा) येथील सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावली. याप्रसंगी मुख्याध्यापकापासून ते शिपाईपर्यंत सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. टी. सूर्यवंशी, बी. जी. भामरे, वरिष्ठ शिक्षक एस. व्ही. राणे, एच. के. पाडवी व सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाचे आलेले त्यांचे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य डी. टी. सूर्यवंशी, उपप्राचार्य बी. जी. भामरे, वरिष्ठ शिक्षक एस. व्ही. राणे, सी. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समितीचे डी. एन. मराठे, एन. एच. महाजन, पी. एस. महाले व सी. ए. पाटील यांनी परिश्रम घेतले.
देवमोगरा माध्यमिक विद्यालय, वसलाई
नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील देवमोगरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर हेमंत खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. हिरालाल लिंगायत यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. प्रमोद सोनार यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती दिली. यावेळी नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिपाई अशी भूमिका निभावली. विद्यार्थी-शिक्षकांनी सर्व वर्गांवर जाऊन अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी मुख्याध्यापक दिशा वळवी, विद्यार्थी पर्यवेक्षक सागर वळवी, विद्यार्थी शिक्षक यांनी आपले अनुभव मनोगतातून मांडले. सूत्रसंचालन हेमंत पाडवी, तर आभार संजय दातीर यांनी मानले. कार्यक्रमास दिलीप वळवी, सुनील वळवी, कारभारी पाटील, गोराणे सुदाम, टिकाराम पाडवी, मनेश वसावे, शैलेंद्र वळवी उपस्थित होते .