जिल्ह्यात जंतनाशक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST2021-09-23T04:34:06+5:302021-09-23T04:34:06+5:30

मोलगी, ता.अक्कलकुवा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यावेळी काठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...

Celebrate deworming day in the district | जिल्ह्यात जंतनाशक दिन साजरा

जिल्ह्यात जंतनाशक दिन साजरा

मोलगी, ता.अक्कलकुवा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यावेळी काठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे, आरोग्य सेवक, औषधनिर्माता, आरोग्य सेविका यांच्या उपस्थितीत विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे महत्त्व मुख्याध्यापक प्रमोद कोळी, पर्यवेक्षक आर. के. वसावे, विज्ञानशिक्षक महेश पाटील, चंद्रकांत पवार यांनी पटवून सांगितले. आरोग्याच्या बाबतीत घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना करून जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळ्या सेवन करून उत्तम प्रतिसाद दिला. शिक्षक कैलास खोंडे, रमेश माळी, अंबालाल खेडकर, राकेश जगताप, मनोज कोळी यांनी उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार

नंदुरबार शहरातील एस. ए. मिशन प्राथमिक शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे मुख्याध्यापिका सुषमा पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच गोरख पाटील यांनी या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Celebrate deworming day in the district