नंदुरबार आगार परिसरावर असणार सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 13:13 IST2017-08-20T13:13:53+5:302017-08-20T13:13:53+5:30
चोरांवर वचक : परिसराचे झाले सव्रेक्षण

नंदुरबार आगार परिसरावर असणार सीसीटीव्हीची नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लवकरच नंदुरबार येथील बसस्थानक परिसरावर सीसीटीव्ही कॅमेराची नजर असणार आह़े याबाबत एका खाजगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आह़े या कंपनीने शनिवारी बसस्थानक परिसराची पाहणी केली़
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आह़े बसस्थानकाला पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षा नसल्याने रात्रीच्या वेळी पाहिजे ती व्यक्तीला बिनदीक्कतपणे बसस्थानक परिसरात फिरता येत होत़े बसस्थानकामध्येच बसेसचे वर्कशॉप असल्याने येथे चो:या चपाटय़ांच्या संख्येतही वाढ होत असल्याची माहिती आगारातील सूत्रांकडून मिळाली आह़े परिसरात अनेक लोखंडी तसेच बसेसचे महत्वाचे भाग असतात़ रात्रीच्या वेळी परिसरात सामसुम असल्याने भुरटय़ा चोरटय़ांचे येथे चांगलेच फावत असत़े त्यामुळे आगार व्यवस्थापनाकडून परिसरात सर्व भाग व्यापला जाईल अशा पध्दतीने सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख निलेश गावीत यांनी दिली़ याबाबत शनिवारी एका खाजगी कंपनीने आगार परिसराची पाहणी केली आह़े लवकरच याबाबत कार्यवाही होणार आह़े