तळोद्यात बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:28 IST2020-06-17T12:28:38+5:302020-06-17T12:28:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरातील अमरधामजवळ गॅरेजमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेमुळे खळबळ उडाली ...

तळोद्यात बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत कैद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरातील अमरधामजवळ गॅरेजमध्ये बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ या भागापासून हाकेच्या अंतरावर हॉटेल्स आणि रहिवासी वसाहती असल्याने चिंता वाढल्या आहेत़
बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्गालगत अमरधामजवळ गॅरेज बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्या कुत्र्यांच्या मागे धावत असल्याचे फुटेज गॅरेजमालकाला दिसून आले होते़ त्याने तातडीने याची माहिती इतरांना दिल्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली़ अचानक दिसून आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे़ सीसीटीव्हीत दिसून येणारा बिबट्या हा संपूर्ण वयस्कर आहे़़ यामुळे त्याच्यासोबत मादी व पिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ तळोदा शहरापासून १ किलोमीटर मीेटर अंतरावर गुजरात हद्द आहे़ अमरधाम ते वनविभाग कार्यालय व त्यामागील परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे़ या भागात रहिवासी वसाहती, पेट्रोलपंप आहे़ तसेच काही हॉटेल्स असल्याने दिवसा वर्दळ असते़ बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये भिती पसरली आहे़ बिबट्या शहरी वसाहतीत आल्यास अनुचित प्रकार घडण्याची भिती आहे़ दरम्यान हा बिबट्या गुजरात राज्यातील बहुरुपा शिवारातून आल्याची माहिती देण्यात येत आहे़ त्याठिकाणी त्याला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ तळोदा वनविभागाकडून उपाययोजना सुरु झाल्या आहेत़